उर्जा वृत्तसेवा
देगलूर – अनेक वर्षापासून सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सदैव लोक सेवेसाठी शहरातील क्षमा बहुउद्देश्यीय सेवाभावी संस्था कार्यरत आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून आणखी एक अभिनव उपक्रम म्हणून शहरातील सर्वसामान्यांचे आरोग्य सुरक्षित व्हावे यासाठी शासनाने आयुष्यमान भारत कार्ड काढून घेण्याचे आवाहन केले आहे पण, बाजारपेठेत हे कार्ड काढून घेण्यासाठी जवळपास १०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत होती.परिसरातील तसेच शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचे नाहक त्रास होऊ नये म्हणून माजी उपनगराध्यक्ष बिस्मिल्लाभाई कुरेशी तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते अबूबकर कुरेशी यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्याचे कॅम्पचे आयोजन केले होते. विशेष या कार्यक्रमात ९७३ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत मोफत कार्ड काढून घेतले तसेच अनेकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर या कॅम्पचे आयोजन माजी उपनगराध्यक्ष बिस्मिल्लाभाई कुरेशी यांच्या नेतृत्वात करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अबूबकर कुरेशी मित्रमंडळाने शर्यतीचे प्रयत्न केले तसेच या कॅमसाठी जवळपास १०-१२ संगणक कार्यान्वीत करण्यात आले होते. कोणत्याही प्रकारचे अडथळा किंवा गर्दी निर्माण होऊ नये यासाठी जास्तीत-जास्त संगणक चालकाकडून सेवा देण्यात आली. त्यामुळे शहरातील नागरिकां तर्फे या उपक्रमाचे कौतुक केल्या जात आहे. सुल्तान कुरेशी,शहरातील प्रतिष्ठित नागरिक,डॉक्टर,पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.