संपर्क
लोकउर्जा वृत्तपत्र हे सत्य, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य करणारे वृत्तपत्र आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जबाबदारीने काम करताना जनतेच्या समस्या, विकासकामे, सामाजिक घडामोडी, शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार, प्रशासन आणि जनहिताच्या विषयांना प्राधान्य देणे हा लोकउर्जाचा मूलभूत उद्देश आहे.
आमचे उद्देश
समाजातील सर्व घटकांपर्यंत अचूक, विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या पोहोचवणे.
ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे.
भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि जनहिताला बाधा आणणाऱ्या बाबी उघडकीस आणणे.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देणे.
लोकशाही मूल्ये, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना बळकटी देणे.
युवक, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
आमचे ध्येय
“सत्यासाठी निर्भीडपणे, समाजहितासाठी सातत्याने” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून जनतेचा विश्वास संपादन करणारे आणि समाजपरिवर्तनासाठी कटिबद्ध असलेले एक सक्षम, जबाबदार आणि लोकाभिमुख माध्यम म्हणून कार्य करणे.
आमची भूमिका
लोकउर्जा हे केवळ वृत्तपत्र नसून जनतेच्या भावना, अपेक्षा आणि समस्यांचे प्रतिनिधित्व करणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक पत्रकारिता करताना लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हीच आमची भूमिका आहे.
संपादक
कपिल राजु उल्लेवार
संपर्क क्रमांक – ९१७५६७७७६८
Gmail ID – lokurja4444@gmail.com
संपर्क कार्यालय – पिरोजदिन टॉकिजच्या बाजूस, देगलूर जि.नांदेड