ग्रामीणदेगलूरनांदेडप्रशासकमराठवाडामहाराष्ट्र

निपाणी सावरगाव स्मशानभूमीचे आंदोलन अखेर मागे

रामदास पाटील सुमठानकरांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे

Lokurja Digital

देगलूर | प्रतिनिधी

देगलूर – निपाणी सावरगाव व येथील स्मशानभूमीच्या प्रलंबित प्रश्नासाठी सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.गावातील स्मशानभूमीसाठी योग्य जागा उपलब्ध करून देणे, अंत्यसंस्कारासाठी आवश्यक शेड, रस्ता, पाणी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आकाश कोकणे यांनी गेली अडीच वर्ष लढा दिला होता.मागील ६ दिवसापासून सरनावर बसून उपोषण सुरू करण्यात आले होते.

काँग्रेसचे नेते रामदास पाटील सुमठाणकर त्यांच्या मध्यस्थीने अखेर उपोषण मागे घेण्यात आले.

या वेळी काँग्रेस नेते मा.रामदास पाटील सुमठाणकर तालुका अध्येक्ष विष्णू पाटील, राजू कांबळे, विकास नरभागे, अनिल अखेमवार,प्रदीप वाघमारे सरपंच चैनपूर, तुकाराम पाटील कोकणे,उपोषण करते आकाश दत्ता पाटील कोकणे, तुकाराम पाटील कोकणे, दिगंबर नारायण राजाळे, माधव रामा वाघमारे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर बालाजी पाटील कोकणे, परमेश्वर कोकणे, नंदू कोकणेव समस्त गावकरी निपाणी सावरगाव त्रिनेत्र प्रबोधन’चे मुख्य संपादक वंकलवार प्रभू आणि कार्यकारी संपादक व आखिल भारतीय बहूजन ओबिसी अल्पसंख्यांक भ्रष्ट्राचार निर्मूल असोसिएशन देगलूर ता पूर्ण टिम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्डिले यांनी सदर प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.यात जिल्हाधिकारी यांनी वेळ दिलेला आहे.

तर तहसीलदार ,बिडिंओ व उपजिल्हाधिकार यांना आज रामदास पाटील यांनी फोन वर संवाद साधलाप्रशासनाच्या आश्वासनाकडे ग्रामस्थांचे लक्ष उपोषण मागे घेण्यात आले असले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार स्मशानभूमीचा प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लागावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. केवळ आश्वासन न देता आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.याच बरोबर कुरडगी,शेखपूर आणी इतर गावच्या स्म्शान भूमीच्या समस्या बद्दल पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

“स्मशानभूमी हा राजकारणाचा नव्हे, तर प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाशी निगडित मूलभूत प्रश्न आहे. प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवावे,”

अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button