देगलूरनांदेडप्रशासकमराठवाडामहाराष्ट्र

आषाढी एकादशी उपवासात ‘भगर’ खरेदी व सेवन करताना घ्या विशेष काळजी – नांदेड जिल्हा प्रशासनाचा इशारा

नियमभंग करणाऱ्या विक्रेत्यांवर होणार कारवाई..!

Lokurja Digital

नांदेड | प्रतिनिधी

नांदेड – उपवासाच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या भगरबाबत नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिक आणि विक्रेत्यांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे.

यापूर्वी महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात भगर खाल्ल्याने अन्न विषबाधेच्या घटना घडल्या असल्याने यंदा नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, दमट वातावरणात भगरवर ॲस्परजिलस (Aspergillus) या बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

या बुरशीमुळे विषारी घटक (टॉक्सिन्स) तयार होऊन अन्न विषबाधेचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे भगर खरेदी, साठवण आणि सेवन करताना नागरिकांनी योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विक्रेत्यांनाही प्रशासनाच्या सूचना

१ – विक्रेत्यांनी केवळ पॅकबंद भगरचीच विक्री करावी.

२ – उत्पादनावरील उत्पादकाचा पत्ता, परवाना क्रमांक, पॅकिंग दिनांक आणि अंतिम वापर दिनांक स्पष्ट असणे आवश्यक आहे.

३ – मुदतबाह्य भगर किंवा भगर पीठाची विक्री करू नये तसेच सुटी भगर व उघडे भगर पीठ विक्रीसाठी ठेवू नये, असे निर्देश विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून भगर विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नांदेड जिल्हा प्रशासनाने दिला आहे.उपवासाच्या काळात नागरिकांनी सुरक्षित आणि दर्जेदार भगरच वापरावी तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून अन्न विषबाधेपासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button