ग्रामीणनांदेडमराठवाडामहाराष्ट्र

शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यां, विरपत्नीचा सन्मान

Lokurja Digital

नांदेड | प्रतिनिधी

नांदेड (प्रतिनिधी) – शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त मुखेड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बामणी गावात करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास पाटील सुमठाणकर, असिस्टंट कमांडंट सौरभ सांगळे, तहसीलदार व्यंकटेश मुंढे, नायब तहसीलदार शालीनी धुळे, देगलूरचे माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार आदी उपस्थित होते.

मुखेड तालुक्यातील बामणी येथील शहिद असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे हे छत्तीसगड राज्यातील नारायणपूर येथे कर्तव्य बजावताना शहिद झाले होते. त्यांच्या शहिद दिनानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या अनुषंगाने मुखेड तालुक्यातील बामणी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच वीर पत्नींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गुरुजी फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास हंसराज पाटील, वीर पत्नी सुधा शिंदे, वीर पिता राजेंद्र शिंदे, आयटीबीपीचे पोलीस उपनिरीक्षक दिपककुमार, पॅरा मिल्ट्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोणे, ज्ञानेश्‍वर डुमणे, सतीश कुबडे, प्रा.शिंदे, मुख्याध्यापक कुलकर्णी, सरपंच प्रतिनिधी मन्नू साब, माधवराव पाटील, दस्तगिर शेख, पोलीस पाटील व्यंकट पाटील, अर्जुन भोसले, विनोद शिंदे, गुरुजी फाऊंडेशनचे अध्यक्ष यशपाल भोसले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन नरवाडे व संजय शिंदे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button