पोलीस पाटील कपिल लोकावार व विरशैव गणेश मंडळाच्या पुढाकारातून ३०० नागरिकांची आरोग्य तपासणी, ३५ जणांचे रक्तदान

देगलूर / प्रतिनिधी
उर्जा वृत्तसेवा
देगलूर – तालुक्यातील येरगी येथे पोलीस पाटील कपिल लोकावार आणि वीरशैव गणेश मंडळ यांच्या संयुक्त पुढाकारातून रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबिराचे उद्घाटन मरखेल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्वास हॉस्पिटल, देगलूरचे डॉ. किरण बिरादार, आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉ. नागेश तौनसुरे, डॉ. हनुमंत पटणे तसेच त्यांच्या वैद्यकीय पथकाने नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व सेवा दिली.
या शिबिरात तब्बल २५० ते ३०० नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर ३५ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदानासोबतच आरोग्य तपासणीचा उपक्रम राबविल्याने नागरिकांसाठी हे शिबिर विशेष उपयुक्त ठरले.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव
गावातील व तालुक्यातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी सन्मान करण्यात आला.जिल्हा परिषद शाळा, येरगीमुख्याध्यापक श्री. नागोराव चव्हाण, आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य कर्मचारी कु. रुपाली जाधव, पाणीपुरवठा कर्मचारी प्रकाश वाघमारे तसेच बीएलओ शीतल मटपती यांचा पोलीस पाटील कपिल लोकावार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य रमेश शिवणीकर, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गंटावार,चेअरमन वैजनाथ कालिंगवार,नंदकीशोर चिदरावार मल्लिकार्जुन काळिंगवार, भुमन्ना पिटलावार,सुनील बरगले, गणेश इजारवार, शंकर वाघमारे, बालाजी वाघमारे, इरना बागेवार, राजु काळिंगवार, हानमंत दानेवार बसवंत काळिंगवार, प्रभाकर काळिंगवार, खुशाल बागेवार, उमाकांत पाटील,आशोक सोमावार, विश्वनाथ पाटील नागनाथ बरसमवार शशिकांत भुरळे ,प्रकाश वाघमारे शिवराज कुंचगे आंतेश्वर बागेवर माधव वाघमारे माधव कुंचगे विठ्ठल सोमावार शिवाजी बरसमवाररमेश देवगीरेनागनाथ बागेवार माधव दाणेवार गजानंन शिलमकोटवारसंभाजी तोटावारबसवंत कुचगेहानमंत भोखसखेडेउमाकांत मन्नेरवार,दत्ता बोंडावार,अनंद चिलकलवार,हानमंत बागेवार,प्रभाकर दानेवार,आनंद गादगे,श्रावण देवगीरे,कपील काळिंगवार शुभम सोमावार,बालाजी बरसमवार,राजु धाकपडे,बालाजी वाघमारे निलेश कालिंगवार,दत्ता कुंचगे,कलप्पा कुडते,सोमनाथ पाटिल,गोविंद तलारवार, नरसिंग चेंडके,राहुल गादगे, रमेश काळिंगवार,रवींद्र बागेवार,संस्कार कुचगे,विजय धनगुलवार,विलास भोकसखेडे,चंदु ईजारवार,साधु ईजारवार,पृभु ईजारवारयांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्तदान, आरोग्य तपासणी आणि समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान अशा त्रिसूत्री उपक्रमातून येरगी येथे ‘सेवेतून समाजहित’चा संदेश देण्यात आला.


