देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात रामदास पाटील सुमठाणकर यांचा ‘दुष्काळ पाहणी व संवाद दौरा’

प्रतिनिधी – देगलूर
उर्जा वृत्तसेवा
देगलूर – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात युवा जनसेवक श्री. रामदास पाटील सुमठाणकर यांच्या नेतृत्वाखाली ‘दुष्काळ पाहणी व संवाद दौरा’ हाती घेण्यात आला आहे. हानेगाव सर्कलपासून या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली असून, देगलूर तालुक्यातील संपूर्ण सर्कलमध्ये हा दौरा असणार आहे.

या दौऱ्यादरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांशी व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या दुष्काळी परिस्थितीचा आणि दैनंदिन अडीअडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या दुष्काळ पाहणी दौऱ्यामुळे तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी आणि तरुणांमध्ये एक नवी आशा निर्माण झाली असून, आपल्या व्यथा थेट नेत्यापर्यंत पोहोचत असल्याचा मोठा विश्वास नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
नागरिकांनी पाण्याच्या तीव्र टंचाईबद्दल, पिकांच्या नुकसानीबद्दल आणि खालावत चाललेल्या भूजल पातळीबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच वीज कपात, रस्ते बांधकामादरम्यान रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि प्रत्येक गावापर्यंत सार्वजनिक वाहतूक न पोहोचल्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या असल्याचे समोर आले.या बिकट परिस्थितीतही नागरिकांमधील जिद्द आणि बदलाची आशा प्रेरणादायी ठरत आहे.
शेतकरी बांधवांना जिथे शक्य असेल तिथे सौर ऊर्जा संचलित पंपांचा वापर करण्याचे आणि भूजल संपत्तीचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच जलसंधारण, पावसाच्या पाण्याचा संचयन, जल साठवणूक, पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धती आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.
दौऱ्यादरम्यान विविध गावांमध्ये स्थानिक प्रतिनिधी आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. यामध्ये हाणेगाव येथे जिल्हा परिषद सदस्य श्री. दिलीप गोविंदराव बनखडके यांच्या निवासस्थानी अज्जू शेठ चमकुडे, मुक्तार सत्तार पटेल, यादवराव म्हणाजी सूर्यवंशी, शिवाजी पाटील लोणीकर आणि श्रीराम बनखडके उपस्थित होते. येडूर येथे पूर्व सरपंच नामदेवराव श्रीपतराव पाटील, मुस्तफा चांद साहब मणियार,पंढरी पाटील आणि प्रभू शिवाजी पाटील यांच्याशी संवाद झाला. कुन्मारपल्ली येथे पूर्व सरपंच प्रल्हाद पाटील, सरपंच श्री. संजय म्हेत्रे,अमृतराव पाटील, पोलीस पाटील रेड्डी आणि गफार भाई उपस्थित होते. तसेच बिज्जलवाडी येथे सुनील पाटील, नागा रेड्डी कोरनाळे आणि गफार भाई यांच्याशी चर्चा करण्यात आली.यावेळी काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकर सर, काँग्रेस तालुका अध्यक्ष विष्णू पाटील शेकापूरकर, महिला काँग्रेसच्या डॉ. पूजा गायकवाड, माधव पाटील, सुभाष कदम लिंगणकेरूकर, धनुसिंग दादा, सरपंच तानाजी पाटील, पूर्व सरपंच जयसिंग पाटील,कोसंबे दादाराव पाटील, वाकडे माधवराव पाटील, इंगोले बालाजी पाटील, हिंगोली व्यंकटराव वाघमारे, प्रेमसिंग जाधव,राजू वाघमारे,पीर साब शेख, रमेश इंगोले यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्ती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौऱ्याद्वारे स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या जात असून, प्रशासनाच्या वतीने यावर योग्य तो पाठपुरावा केला जाईल असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे.


