Uncategorized

देगलूरच्या साधना हायस्कूलचे बॅडमिंटन स्पर्धेत यश

Lokurja Digital

देगलूर | प्रतिनिधी

नांदेड – नांदेड येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मुले-मुली बॅडमिंटन स्पर्धेत देगलूरच्या साधना हायस्कूलचे १४ वर्षे वयोगटातील मुले बॅडमिंटन स्पर्धेत विभागीय स्तरासाठी पात्र ठरले आहेत.

कर्णधार यशवर्धन चव्हाण, सोहम भाले, सोहम शेटकार, किरण मुंडकर, पांडुरंग पांचाळ या सर्व खेळाडूंनी दमदार खेळ करत आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

त्यांच्या या यशाबद्दल श्री संत गाडगेबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सदाशिवराव कावळगावकर, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश यशवंतराव जाधव हाळीकर तसेच संस्थेचे सचिव संग्राम बंडप्पा मळगे व शाळेचे मुख्याध्यापक यादव बत्तुलवार सर, उप मुख्याध्यापक बी.एन.सुगावकर सर पर्यवेक्षक गोणे, आंबेकर सर व क्रीडा शिक्षक या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button