
Lokurja Digital
देगलूर | प्रतिनिधी
देगलूर – आज २२ रोजी सकाळी १०:३७ वाजताच्या सुमारास डायल ११२ वर CFS No 38953239 वरून आकाश मारोती टेकवार (रा. तमलूर, ता. देगलूर, जि. नांदेड) याने पोलिसांना कॉल करून मदत मागितली होती. सदर कॉलला तात्काळ प्रतिसाद देत डायल ११२ चे पोलीस अंमलदार पोका ४५६ ओमप्रकाश डिडेवार व पोका १०५४ सिद्धार्थ वाघमारे हे सरकारी वाहनाने तमलूर बसस्थानक येथे पोहोचले.
पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता सदर इसम आकाश टेकवार हा दारूच्या अंमलाखाली मिळून आला. पोलिसांनी ११२ वर कॉल करण्याच्या कारणाबाबत विचारपूस केली असता बरोबर माहिती न देता दारूच्या नशेत सार्वजनिक रोडवर मोठ्याने आरडाओरडा केली.
त्याच्या तोंडाचा उग्र वास येत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यास उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे घेऊन जाऊन वैद्यकीय तपासणी केली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदरचा इसम दारूच्या नशेत असल्याचा अभिप्राय दिला,
त्यावरून ओमप्रकाश डिडेवार यांच्या तक्रारीवरून आरोपी आकाश मारोती टेकवार याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९६/२६ कलम ८५ (१) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास बीट जमादार मोहन कणकवळे करीत आहेत.



