देगलूरनांदेडप्रशासकमराठवाडामहाराष्ट्र

प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ यांनी स्वीकारला देगलूर ठाण्याचा पदभार

३ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीत देगलूर पोलीस ठाण्याची धुरा सांभाळणार

Lokurja Digital

प्रतिनिधी | देगलूर

देगलूर – आहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे मूळ रहिवासी असलेले सन २०२२ बॅचचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ यांनी सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी देगलूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदाचे पदभार स्वीकारले.

प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून वैभव पडवळ यांची देगलूर पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील ३ महिने ते देगलूर पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळणार आहेत.

या कालावधीत पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजासह कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, तपास प्रक्रिया तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण याबाबत प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

सन २०२२ बॅचचे अधिकारी असलेल्या पडवळ यांच्या नियुक्तीमुळे देगलूर पोलीस ठाण्याच्या कामकाजाला प्रशिक्षणाचा नवा अनुभव मिळणार असून, त्यांच्या तीन महिन्यांच्या कार्यकाळाकडे पोलीस वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button