ग्रामीणदेगलूरनांदेडप्रशासकमराठवाडामहाराष्ट्र

देगलूरच्या सरस्वती विद्यालयात अखेर पालक समिती गठीत होणार!

लोकउर्जा संपादकाच्या तक्रारीचा इंग्रजी शाळांना धसका..!

Lokurja Digital

प्रतिनिधी | देगलूर

देगलूर – शहरातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयाच्या कारभाराबाबत पालकांच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित करत लोकउर्जा संपादक कपिल उल्लेवार यांनी केलेल्या तक्रारीला अखेर यश आले आहे.

पालक संघटना व समितीच्या स्थापनेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची दखल घेत देगलूर शहरातील इंग्रजी शाळा प्रशासनाने आता पालक मीटिंग समिती गठीत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी सरस्वती विद्यालयाचे रविवार, १६ ऑगस्ट रोजी देगलूर शहरातील सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे पालकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पालक मीटिंग समिती गठीत करण्याची प्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारीनंतर शाळेला जाग!

शाळेच्या व्यवस्थापनात पालकांचा सहभाग असावा, विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी पालकांना अधिकृत व्यासपीठ मिळावे आणि शाळेच्या कामकाजाबाबत पालकांचा आवाज ऐकला जावा, या मागणीसाठी लोकउर्जा संपादक कपिल उल्लेवार यांनी उपजिल्हाधिकारी अनुप पाटील व संबंधित प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अखेर शाळा प्रशासनाकडून पालकांची बैठक घेऊन समिती गठीत करण्याची हालचाल सुरू झाली आहे. त्यामुळे “तक्रारीचा आवाज उठला आणि शाळेला जाग आली” अशी चर्चा देगलूरमध्ये सुरू झाली आहे.

आता पालक समिती खरंच सक्षम होणार का?

पालक समितीची स्थापना हा केवळ कागदोपत्री सोपस्कार न राहता ती विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रभावीपणे कार्यरत होणे गरजेचे आहे. शाळेतील शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या अडचणी, पालकांच्या तक्रारी तसेच शाळेच्या एकूण व्यवस्थापनाबाबत पालकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी समिती सक्षम व्यासपीठ ठरली पाहिजे.१६ ऑगस्टच्या बैठकीकडे आता पालकांचे लक्ष लागले असून, या बैठकीत नेमकी कोणती प्रक्रिया राबविली जाते आणि पालक समितीला किती अधिकार व स्वायत्तता दिली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकउर्जेच्या पाठपुराव्याला यश

सामान्य पालकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि शाळा प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देणे, हा पत्रकारितेचा उद्देश असल्याचे लोकउर्जा संपादक कपिल उल्लेवार यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. आता त्यांच्या तक्रारीनंतर पालक समिती गठीत करण्यासाठी बैठक आयोजित झाल्याने लोकउर्जेच्या पाठपुराव्याला यश आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.आता समिती कागदावरच राहते की पालकांच्या हक्कासाठी प्रत्यक्ष आवाज उठवते, याकडे देगलूरकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button