Uncategorized

देगलूर तालुक्यातील शहापूरात ‘जय भवानी गणेश मंडळ’ यांच्या वतीने विविध स्पर्धा

Lokurja Digital

देगलूर | प्रतिनिधी

देगलूर – शहापूरात व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १० संघानी सहभाग नोंदविला. स्पर्धेत सर्वच संघांनी अतिशय चुरशीची लढत दिली आणि सर्वांनीच उत्तम कामगिरी केली.

या अत्यंत रोमांचक स्पर्धेत श्री. क्रांती गणेश मंडळ, शहापूर या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम पारितोषिक पटकावले, तर जय भवानी गणेश मंडळ, शहापूर या संघाने द्वितीय पारितोषिक आणि सार्वजनिक गणेश मंडळ, शहापूर या संघाने तृतीय पारितोषिक पटकावले.

प्रथम पारितोषिक पटकावलेल्या श्री. क्रांती गणेश मंडळाच्या विजयात कर्णधार योगेश आरकलवार यांच्यासह अनिकेत पुल्लागोर, दिलीप दोंगलवार, यशपाल कंनकंटे, लच्छाराम सुरकुंटे, निखिल जोरगुलवार, पवन पांचाळ, अजय तेलंगे, संजय पांचाळ, शंकर शेषनगार आणि श्रावण पुल्लागोर या सर्व खेळाडूंनी अप्रतिम खेळ केला.

या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाबद्दल बेस्ट अटॅकर म्हणून योगेश आरकलवार यांना तर बेस्ट लिब्रो म्हणून संतोष कोत्तावार यांना गौरवण्यात आले.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५,१०० रुपये कै. नितीनरेड्डी अचनगार यांच्या स्मरणार्थ श्री. श्रीनिवासरेड्डी वेंकटरेड्डी मामडे यांच्यातर्फे देण्यात आले. द्वितीय पारितोषिक ३,१०० रुपये मल्लनरेड्डी मल्लू चिंतलवार (मा. जि. प. सदस्य, शहापूर) यांच्यातर्फे आणि तृतीय पारितोषिक १,१११ रुपये विठ्ठलरेड्डी पुल्लागोर यांच्यातर्फे देण्यात आले.

या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रीय खेळाडू गंगारेड्डी यालावार, मा. जि.प. सदस्य मल्लनरेड्डी चिंतलवार, विठ्ठलरेड्डी पुल्लागोर, नरदेवरेड्डी पुल्लागोर, व्यंकटरेड्डी मामडे आणि भुमरेड्डी चामावार हे होते.सर्व सामने व्यवस्थित व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी रतन चिंतलवार, वैभव मामडे, ऋतिक सुरकंटे, सचिन चामावार आणि जय भवानी गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेऊन मोलाचे प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button