जावयाला गंभीर दुखापत प्रकरणी दोन आरोपींना न्यायपूर्ण द्रव्य दंडाची शिक्षा
धर्माबाद न्यायालयाचा न्यायपूर्ण निकाल

Lokurja Digital
प्रतिनिधी | नांदेड
धर्माबाद – १० ऑगस्ट २०२६ रोजी गंभीर दुखापत करून मारहाण केल्याच्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, धर्माबाद मा.श्री.संजय कोळेकर साहेब यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण व कायद्याचा धाक व फिर्यादी व आरोपी यांचेतील नात्याचा विचार करुन तुरुंगवासाची शिक्षा न देता द्रव्य दडाची शिक्षा देवून दोन आरोपींना दोषी ठरवून प्रत्येकी ७००० हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सरकारी अभियोक्ता श्रीमती सी. बी. काळे यांचा प्रभावी युक्तिवाद; पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, तपासीक अधिकारी बि.डी.रेणके,पो.हे.कॉं.१८४१ व पैरवी अधिकारी खदीर शेख यांच्या प्रयत्नांना यश
धर्माबाद पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. ११७/ २०१६ व न्यायालयीन खटला क्र. ०३/२०१७ मध्ये आरोपी सय्यद हैदरअली मदारशाह (वय ५५) रा. मनुर ता.धर्माबाद जि.नांदेड व सय्यद शदुल्ला हुसेनसाब (वय २५) र्रा. पोखर्णी, ता. धर्माबाद, जि. नांदेड यांनी फिर्यादीला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. सादर करण्यात आलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि संपूर्ण न्यायालयीन सुनावणीचा बारकाईने विचार करून न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड संहितेतील कलम ३२४,३२३ व ५०६ सह ३४ अंतर्गत दोषी ठरविले.
न्यायालयाने आरोपींना कलम ३२४ अंतर्गत प्रत्येकी ₹ ४००० दंड, कलम ३२३ अंतर्गत प्रत्येकी ₹ १,००० दंड तसेच कलम ५०६ अंतर्गत प्रत्येकी रु. २०००/- दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडाच्या रकमेपैकी ₹ ७,००० नुकसानभरपाई फिर्यादी सय्यद पाशा सय्यद जाफरसाब यास देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती.सी.बी.काळे यांनी कायदेशीर तरतुदी, पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण युक्तिवाद करत सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. त्यांच्या सक्षम युक्तिवादामुळे दोषारोप सिद्ध होण्यास महत्त्वाची मदत झाली.
या प्रकरणाच्या तपासात तपासी अधिकारी बि.डी.रेणके यांना धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गणेश चव्हाण व पैरवी अधिकारी श्री.खदीर शेख यांनी तपास कार्यात मोलाचे सहकार्य करून सरकार पक्षाची बाजू अधिक भक्कम करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. धर्माबाद पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही या प्रकरणात उल्लेखनीय सहकार्य केले.



