मुलगी ही सृष्टीची निर्मिती, मुलीच्या जन्माचे स्वागत करूया..!

मुलगी म्हणजे काय असतं?बापाच्या काळजाचा तुकडा असतो.आईच्या मायेचा पदर असतो,आजीच्या संस्काराची शिदोरी असते.आजोबांचा प्रेमळ स्पर्श असतो,भावाच्या समजुतदारीचा कट्टा असतो.आणि काय शेवटी परक्याचं धन असतं.
Lokurja Digital
मुलगी त्याच नशीब वाल्या माणसांना मिळतंय ज्यांच्या घराची स्फूर्ती व भरारी होण्याची गरज असते आणि आज तर तुम्हाला जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्याई, शेख फातिमा यांच्या रूपात मुलगी मिळाली..तिचे पण खूप खूप अभिनंदन व स्वागत…आपल्या घरात अजून भरभराट आनंद झाला तिचे खूप खूप मनस्वी सुस्वागतम..मुलगी ही सृष्टीची निर्माती, कुटुंबाचा आधार आणि समाजाच्या प्रगतीचा महत्त्वाचा घटक आहे. तरीही काही ठिकाणी मुलगी जन्माला येणार असल्याचे समजल्यावर गर्भपात करण्याचा विचार केला जातो. ही अत्यंत चुकीची आणि अमानवी कृती आहे. मुलगा आणि मुलगी हे दोघेही समान आहेत. प्रत्येक बालकाला जन्म घेण्याचा आणि जगण्याचा समान अधिकार आहे. आज मुली शिक्षण, विज्ञान, क्रीडा, प्रशासन, उद्योग आणि राजकारण अशा सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवत आहेत. अनेक मुलींनी आपल्या कर्तृत्वाने देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे मुलगी ही कोणत्याही बाबतीत मुलापेक्षा कमी नाही, हे सिद्ध झाले आहे.
स्त्री-भ्रूणहत्या आणि लिंगनिवड चाचणी या कायद्याने गुन्हे आहेत. अशा कृत्यांमुळे समाजातील स्त्री-पुरुष प्रमाण बिघडते आणि अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे मुलीचा गर्भपात न करता तिचे स्वागत करणे, तिला शिक्षण व संधी देणे आणि तिच्या स्वप्नांना बळ देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मुलगी म्हणजे घराचा मान, कुटुंबाचा अभिमान आणि राष्ट्राची शान आहे. म्हणूनच “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” हा संदेश प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे.
मुलीचा गर्भपात न करता तिच्या जन्माचे स्वागत करूया आणि समतामूलक समाज घडवूया.काल माझ्या बहिणीला मुलगी झाली म्हणून माझ्या घरात व माझ्या बहिणीच्या सासर घरात एक वेगळीच आनंदाची बातमी पसरून सर्वांना एक चाहूल दिली आहे. त्या लहान बाळाचे मनःपूर्वक स्वागत…
स्वागत कक्ष :
पूजा विजय भुताळे ( मम्मी पप्पा ),सुनीता संजय वाघमारे ( आजी आजोबा ),आशाताई जगदीश भुताळे ( आजी आजोबा ) व सर्व माहेर घर आणि सासर घर.
– नवयुवक कवी लेखकसदानंद
संजय वाघमारे , मो. ७८८७३११६६५



